वजन

मानसशास्त्राचे प्राध्यापक एका कार्येक्रमात व्याख्यान देत होते . त्यांनी अचानकच टेबलावरचा काचेचा ग्लास उचलला . त्यात पाणी होतं . तो ग्लास त्यांनी उंचावला .  श्रोत्यांमध्ये कुजबुज सुरु झाली . तेवढ्यात वक्त्यानं प्रश्न केला , “माझ्या हातातल्या या ग्लासचं वजन किती असेल ? ”. कोणी १०० ग्रॅम , कोणी २५० ग्रॅम तर कोणी ३०० ग्रॅम  सांगितलं . 

    वक्त्यानं  पुढे बोलायला सुरुवात केली ,”मी जर एक दोन मिनिटापुरतंच  हा ग्लास अश्याच तऱ्हेनं धरून ठेवल्यास  फारसा जड वाटणार नाही . दहा मिनिटं धरला तर नकोसा वाटेल . तासभर धरल्यास हाताला कळ येईल . दहा तास धरून ठेवण्याचा प्रयन्त केल्यास काही वेळानंतर हात बधिर व्हायला लागेल . हात असूनही नसल्यासारखा होऊन जाईल . त्यानं मला काहीच करता येणार नाही . आता हा ग्लास मी खाली ठेवतो . बघा , ग्लास तोच . त्याच्या वजनात कुठल्याच प्रकारची घट किंवा वाढ नाही . फक्त मी तो किती वेळ हातात धरून ठेवणार , त्यावर त्याचा मला होणारा त्रास अवलंबून असणार ”. 

हा लेख मी   सकाळ पेपर मध्ये वाचला होता . आणि वाचताक्षणी तो मला लक्ष्यात राहिला , कायमचा. 

बघा ना , आपण एखादी गोष्ट मनात धरून ठेवतो. कधी कधी थोडा वेळ पण कधी कधी खूप काळासाठी . त्या गोष्टीला एवढे महत्व देण्याची गरज नसतानाही .  त्याने तिची त्रीव्रता कमी होत नाही किंवा वाढत हि नाही . होतो तो फक्त त्रास. ग्लास हातात धरून ठेवल्यावर जसा हात बधिर होतो त्याचप्रमाणे एखादी गोष्ट गरजेपेक्षा जास्ती वेळ धरून ठेवली तर आपल्या मनाला  आणि डोक्याला  बधिरपणा येतो.


Write a comment ...

Write a comment ...

Neha Unavane

Inspiring people to live a happy and meaningful life they will be proud of !