Untold  Story  Of Independent  India

The Kashmir Files...

मी कोणत्या हि राजकीय पक्ष्याची समर्थक नाही किंवा विरोधक हि नाही . मी भारताचा एक नागरिक म्हणून हे मतं मांडत आहे . भारतीय सिनेश्रुष्टीचा एक प्रेक्षक म्हणून मी  हा चित्रपट पहिला. 

आतापर्यंत  काश्मीर बद्दल खूप ऐकलं आहे . तिथलं सौंदर्य तिथली माणसं आणि तिथे होणाऱ्या गोष्टी . हे सगळं  ऐकून आहोत आपण . चित्रपटात दाखवलेला सत्य कथेवर आधारित आहे. १९९० साली काश्मिरी पंडितांवर जो अन्याय झाला त्यावर हा चित्रपट आधारित आहे. काय खरं आणि  काय खोटं ह्यावर मी बोलणार नाहीये. हे ज्याचं त्यानं ठरवावं.

चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर उत्कृष्ट दिग्दर्शन  , सगळ्यांचा  उत्तम अभिनय. उत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी. दाद द्यावी वाटते चिन्मय मांडलेकर च्या अभिनयाची . एकीकडे पावनखिंड मध्ये छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या भूमिकेमध्ये आणि दुसरीकडे काश्मीर फाइल्स मध्ये  farooqबिट्टा च्या भूमिकेत.  

पल्लवी जोशी चा अभिनय म्हणजे पर्वणीच असते . ह्या वेळीस तिची भूमिका नकारात्मक असली तरी त्यातही उत्कृष्ट अभिनय . २ मिनिटे चीड येते तिने साकारलेल्या पात्राची  पण मला असा वाटतं हीच तिच्या कामाची पोचपावती आहे. अनुपम खेर च्या अभिनयाने मी निशब्द झाले .  काश्मिरी पंडितांची कळवलं , ते सगळे लोक जेव्हा कॅम्प मध्ये येतात तेव्हा “article ३७० हटाव ” चा नारा सगळं च मनाला भिडल. चित्रपटात एकच गाणं आहे - Hum Dekhengeआणि ते हि खूप सुंदर संगीतबद्ध  केलेलं आहे . 

आपण काश्मीर ला आणि त्याच्या सगळ्या गोष्टींना खूप लांबून पाहत आलो आहोत  . पण ज्यांनी ते सहन केलं आले त्यांच्यावर काय वेळ आली असेल हे चित्रपट पाहून लक्ष्यात येते . कदाचित आपण comfort झोन मधून काश्मीर ला नेहमी लांबूनच पाहत आलोय त्यामुळे तिथे घडत असलेल्या आणि घडून गेलेल्या गोष्टीची आपल्याला इथे बसून तेवढी त्रीव्रता जाणवली नाही  अस माझा वैयक्तिक मतं आहे . अर्थात गोष्टी ऐकून त्यांच्याविषयी वाईट वाटणं वेगळं . हळहळ व्यक्त करतो आपण आणि विसरून जातो पण ज्या लोकांनी ते सगळं अनुभवलं आहे त्यांना हा चित्रपट पाहून नक्कीच इतक्या वर्षांचं सगळं मनात साठून राहिलेल्या आठवणी बाहेर आल्या असतील.  


Buddha In a traffic jam, The Taskant Files  नंतर चा हा चित्रपट विवेक भारद्वाज च्या करिअर मधील शिरपेच आहे .  पूर्णपणे अभ्यास करून  आणि विचारपूर्वक हा चित्रपट निर्मित केला आहे. एकंदरीतच सत्य घटनेवर आधारित असलेला हा चित्रपट एकदा तरी नक्की च पाहायला हवा.
Thank You  विवेक अग्निहोत्री आणि पल्लवी जोशी  हा विषय आणि इतिहास आमच्यासमोर आणल्याबद्दल .  हा चित्रपट आहे तसा पाहावा. त्यावर तर्क वितर्क लावत बसण्यापेक्षा त्यात केलेला अभिनय आणि मेहनत पाहावी .. आणि हा चित्रपट पाहून समाजात फूट पडेल का , ती कोणात पडेल हे मुद्दे जरी समोर असले तरी त्याचा आपण भाग न  होता त्याबद्दल जागरूक राहून एक सुजाण  नागरिक म्हणून आपले कर्तव्य पार पाडूया .

मला माहित नाही हा चित्रपट पाहून आता आपण त्यांच्यासाठी काही करू शकतो का. पण एवढं नक्की आपण ज्या देशाचा भाग आहोत त्याच्या इतिहासात काय झाला होता हे नक्की माहित असायला हवं . अज्ञानात सुख असतं असं म्हणतात पण ज्ञानात शहाणपण आहे असं मला वाटतं. 

Write a comment ...

Write a comment ...

Neha Unavane

Inspiring people to live a happy and meaningful life they will be proud of !